1दावीद आणि निवासमंडपाच्या अधिकाऱ्यांनी मिळून आसाफाच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती अपत्ये. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी:
2आसाफाच्या वंशातले:
3यदूथूनाचे वंशज:
4हेमानाचे वंशज:
5हेमान हा राजाचा संदेष्टा होता, हे सर्व हेमानाचे पुत्र शिंग वाजवायला होते. देवाने हेमानाला चौदा मुले आणि तीन मुली देऊन सन्मानीत केले.
6हे सर्व आपल्या पित्याच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराच्या घरात ही अपत्ये झांजा, सतारी आणि वीणा वाजवून गीते गाण्यासाठी आणि देवाच्या घरातील सेवेसाठी होते. आसाफ, यदूथून व हेमान हे राजाच्या देखरेखीखाली होती.
7ते आणि त्यांचे नातेवाईक गायनकलेत पारंगत व परमेश्वरासाठी गायनाचे प्रशिक्षण घेतलेले दोनशे अठ्याऐशींजण होते.
8त्यांनी लहानथोर, गुरु-शिष्य सर्वानी आपल्या कामासाठी सारख्याच चिठ्ठ्या टाकल्या व कामे वाटून घेतली.
9तेव्हा आसाफाच्या मुलांच्या संबंधीत:
10तिसरी चिठ्ठी जक्कूरचे पुत्र आणि भाऊबंद यांच्यामधून, बाराजणांना घेतले.
11चौथी चिठ्ठी इस्रीची, त्याचे पुत्र आणि आप्त यांच्यामधून बाराजणांना घेतले.
12पाचवी नथन्याची त्याचे पुत्र व नातलग यामधून बाराजण.
13सहावी चिठ्ठी बुक्कीयाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
14सातवी यशरेलाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
15यशयाची आठवी. या चिठ्ठीनुसार पुत्र आणि भाऊबंद यामधून बाराजण.
16नववी मत्तन्याची. त्याचे पुत्र आणि नातलग यामधून बाराजण.
17दहावी शिमीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
18अकरावी अजरेलाची. त्याचे पुत्र आणि नातलाग यांमधून बाराजण.
19बारावी हशब्याची. त्याचे पुत्र आणि त्याचे नातलग यांमधून बाराजण.
20तेरावी शूबाएलाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
21चौदावी मत्तिथ्याची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.
22पंधरावी यरेमोथची. त्याचे पुत्र आणि नातेवाईक यांमधून बारा.
23सोळावी हनन्याची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
24सतरावी याश्बकाशाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
25अठरावी हनानीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
26एकुणिसावी मल्लोथीची. त्याचे पुत्र आणि आप्त यांमधून बाराजण.
27विसावी अलीयाथची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.
28एकविसावी होथीरची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
29बावीसावी गिद्दल्तीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
30तेविसावी महजियोथची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.