१ इतिहास 6:1-80 IRVMar - Bible AI

1गेर्षोन, कहाथ आणि मरारी हे लेवीचे पुत्र.

2अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल हे कहाथाचे पुत्र.

3अहरोन, मोशे, मिर्याम हे अम्रामचे पुत्र. नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे अहरोनाचे पुत्र.

4एलाजाराचा पुत्र फिनहास, फिनहासचा अबीशूवा.

5अबीशूवाचा पुत्र बुक्की. बुक्कीचा पुत्र उज्जी.

6उज्जीने जरह्या याला जन्म दिला आणि जरहयाने मरायोथला.

7मरायोथ हा अमऱ्या याचा बाप. आणि अमऱ्या अहीटूबचा.

8अहीटूबचा पुत्र सादोक. सादोकाचा पुत्र अहीमास.

9अहीमासचा पुत्र अजऱ्या. अजऱ्याचा पुत्र योहानान.

10योहानानाचा, पुत्र अजऱ्या, शलमोनाने यरूशलेमामध्ये मंदिर बांधले तेव्हा हा अजऱ्याच याजक होता.

11अजऱ्या याने अमऱ्या याला जन्म दिला. अमऱ्याने अहीटूबला.

12अहीटूबचा पुत्र सादोकाचा पुत्र शल्लूम.

13शल्लूमचा पुत्र हिल्कीया. हिल्कीयाचा पुत्र अजऱ्या.

14अजऱ्या म्हणजे सरायाचे पिता. सरायाने यहोसादाकला जन्म दिला.

15परमेश्वराने नबुखद्नेस्सराच्या हातून यहूदा आणि यरूशलेम यांचा पाडाव केला तेव्हा यहोसादाक युध्दकैदी झाला.

16गर्षोम, कहाथ आणि मरारी हे लेवीचे पुत्र.

17लिब्नी आणि शिमी हे गर्षोमचे पुत्र.

18अम्राम, इसहार, हेब्रोन, उज्जियेल हे कहाथाचे पुत्र.

19महली आणि मूशी हे मरारीचे पुत्र. लेवी कुळातील घराण्यांची ही नावे. पित्याच्या घराण्याप्रमाणे त्यांची वंशावळ दिलेली आहे.

20गर्षोमचे वंशज असे, गर्षोमचा पुत्र लिब्नी.

21जिम्माचा पुत्र यवाह.

22कहाथाचे वंशज असे,

23अस्सीरचा पुत्र एलकाना आणि एलकानाचा पुत्र एब्यासाफ. एब्यासाफचा पुत्र अस्सीर.

24अस्सीरचा पुत्र तहथ,

25अमासय आणि

26एलकानाचा पुत्र सोफय.

27नहथचा पुत्र अलीयाब.

28थोरला योएल आणि दुसरा अबीया हे शमुवेलाचे पुत्र.

29मरारीचे पुत्र,

30उज्जाचा पुत्र शिमा

31कराराचा कोश तंबूत ठेवल्यावर दावीदाने परमेश्वराच्या घरात गायनासाठी काही जणांची नेमणूक केली.

32यरूशलेमेत शलमोन परमेश्वराचे मंदिर बांधीपर्यंत ते दर्शनमंडपाच्या निवासमंडपासमोर गायनपूर्वक सेवा करीत व ते आपल्या कामावर क्रमानुसार हजर राहत.

33गायनसेवा करणाऱ्यांची नावे, कहाथ घराण्यातील वंशज,

34शमुवेल एलकानाचा पुत्र.

35तोहा सूफाचा पुत्र. सूफ एलकानाचा पुत्र.

36अमासय एलकानाचा पुत्र.

37सफन्या तहथचा पुत्र.

38कोरह इसहारचा पुत्र.

39आसाफ हेमानाचा नातलग होता.

40शिमा मीखाएलचा पुत्र.

41मल्कीया एथनीचा पुत्र,

42अदाया एतानाचा पुत्र.

43शिमी यहथ याचा पुत्र.

44मरारीचे वंशज हेमान आणि आसाफ यांचे नातलग होते. गाताना त्यांचा गट हेमानच्या डावीकडे उभा राहत असे. एथान हा किशीचा पुत्र.

45मल्लूख हशब्याचा पुत्र.

46हिल्कीया अमसीचा पुत्र.

47शेमेर महलीचा पुत्र.

48आणि त्यांचे भाऊ लेवी देवाच्या घराच्या मंडपाच्या सर्व सेवेस नेमलेले होते.

49अहरोन व त्याचे पुत्र हे होमवेदीवर आणि धूपवेदीवर अर्पणे करीत असत. देवाचा सेवक मोशे याने जे आज्ञापिले त्याप्रमाणे परमपवित्रस्थानाच्या सर्व कामासाठी व इस्राएल लोकांकरता प्रायश्चित्त करीत.

50अहरोनाचे वंशज असे मोजले,

51अबीशूवाचा पुत्र बुक्की. बुक्कीचा पुत्र उज्जी. उज्जीचा पुत्र जरह्या.

52जरह्याचा पुत्र मरायोथ. मरायोथचा पुत्र अमऱ्या. अमऱ्याचा पुत्र अहीटूब.

53अहीटूबचा पुत्र सादोक आणि सादोकाचा पुत्र अहीमास.

54अहरोनाच्या वंशाला नेमून दिलेले राहण्याचे स्थान खालीलप्रमाणे होते. कहाथ कुळाची पहिली चिठ्ठी निघाली.

55यहूदा देशातील हेब्रोन नगर आणि त्याच्या आसपासची कुरणे त्यांना मिळाली.

56त्यापुढची जागा आणि हेब्रोन नगराजवळची खेडी यफुन्नेचा पुत्र कालेब याला मिळाली.

57अहरोनाच्या वंशजांना हेब्रोन हे नगर मिळाले. हेब्रोन हे आश्रयनगर होते. याखेरीज त्यांना लिब्ना, यत्तीर, एष्टमोवा,

58हीलेन त्याच्या कुरणासह, दबीर त्याच्या कुरणासह.

59आशान, युत्ता, आणि बेथ-शेमेश ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली.

60बन्यामीनच्या वंशातील लोकांस गिबा, अल्लेमेथ, अनाथोथ ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली. कहाथाच्या वंशजांना तेरा नगरे मिळाली.

61कहाथाच्या उरलेल्या काही वंशजांना चिठ्ठ्या टाकून मनश्शेच्या अर्ध्या वंशांतून दहा नगरे मिळाली.

62गर्षोमच्या वंशजातील कुळांना तेरा नगरे मिळाली. ही त्यांना इस्साखार, आशेर, नफताली आणि बाशान मधील काही मनश्शे या वंशांच्या घराण्यांकडून मिळाली.

63मरारीच्या वंशजांतील कुळांना बारा नगरे मिळाली. रऊबेनी, गाद आणि जबुलून यांच्या घराण्यांतून, चिठ्ठ्या टाकून त्यांना ती मिळाली.

64ही नगरे व भोवतालची जमीन इस्राएल लोकांनी मग लेवींना दिली.

65यहूदा, शिमोन आणि बन्यामीन यांच्या घराण्यातून, चिठ्ठ्या टाकून, लेवी वंशजांना ती नगरे देण्यात आली.

66एफ्राईमाच्या वंशजांनी काही नगरे कहाथाच्या वंशजांना दिली. ती ही चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात आली.

67एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील आश्रयाची नगरे शखेम व त्याचे कुरण, तसेच गेजेर व त्याचे कुरण,

68यकमाम, बेथ-होरोन,

69अयालोन आणि गथ-रिम्मोन ही नगरे कुरणाच्या जमिनीसकट त्यांना मिळाली.

70मनश्शेच्या अर्ध्या वंशातून इस्राएलांनी आनेर आणि बिलाम ही गावे कुरणासह कहाथाच्या वंशाच्या लोकांस दिली.

71गर्षोमच्या वंशजांना बाशानातले गोलान आणि अष्टारोथ हे त्यांच्या भोवतालच्या कुरणासह, मनश्शेच्या अर्ध्या वंशाकडून मिळाले.

72त्याखेरीज गर्षोमच्या वंशजांना केदेश, दाबरथ, रामोथ, आनेम ही नगरे भोवतालच्या कुरणासह इस्साखाराच्या वंशजांकडून मिळाली.

73रामोथ त्याच्या कुरणासह आणि आनेम त्याच्या कुरणासह.

74माशाल, अब्दोन, हूकोक, रहोब ही नगरे, कुरणासह, आशेर वंशातून गर्षोम कुटुंबांना मिळाली.

75हुकोक कुरणासह आणि रहोब कुरणासह दिली.

76गालीलमधले केदेश, हम्मोन, किर्याथाईम ही कुरणासह नगरे नफतालीच्या वंशातून गर्षोम वंशाला मिळाली.

77आता उरलेले लेवी म्हणजे मरारी लोक त्यांना योकनीम, कर्ता, रिम्मोनो आणि ताबोर ही नगरे जबुलूनच्या वंशाकडून मिळाली. नगराभोवतीची जमिनही अर्थातच मिळाली.

78यार्देनेच्या पलीकडे यरीहोजवळ, यार्देन नदीच्या पूर्वेला रऊबेनी वंशाकडून बेसेर कुरणासकट, यहसा भोवतालच्या कुरणासकट,

79कदेमोथ कुरणासकट आणि मेफाथ कुरणासकट दिली.

80मरारी कुटुंबांना गाद वंशाकडून गिलाद येथील रामोथ, महनाईम कुरणासकट;